प्रेम
प्रेम
दोन शब्द प्रेमाने बोलल्यावर
मनाला जरा बरं वाटते
नात्यातील प्रेम ही मग
एकदम खरखुर वाटते
हात हातात घेऊन बसल्यावर
हृदय आपलं सुखावून जाते
मीठीत त्याने घेतल्यावर
अवघे जग जिंकल्यागत वाटते
त्याने आपली काळजी घेतल्यावर
महालाची राणी झाल्यागत वाटते
डोक्यावरून हात फिरवताच
चेहऱ्यावर आपल्या हसु बहरते
मी त्याची अनं फक्त तो माझा
हा विचारच सुखावून जाते
तो सोबतीने असल्यावर
मन माझे गुज प्रितीचे गाते
राजा आणिक राणी सारखं
सुखी संसार आपलं वाटते
चटणी अनं भाकरही मग
पुरणपोळीस मागे सारते
आम्ही दोन अनं आमचे दोन
ही कल्पणाच भारी वाटते
सुख पदरी आलेलं पाहून
उर माझा गहिवरून येते
दृष्ट न लागो कुणाची संसाराला
हेच देवाजवळ मागणे मागते
राजा राणी झोपडीचे आम्ही
तुम्हा सर्वांना हसत सांगते
