STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

प्रेम विवाह

प्रेम विवाह

1 min
305

माझे तुझ्यावर होते

अगणित प्रेम 

तु पण खूप लावलास 

माझ्यावर जीव 


दोघे हातात हात घालुन 

बागेत फिरलो 

झाडाच्या आडोशाला बसलो

समुद्रकिनारी मनसोक्त हिंडलो 


कधी कधी भांडलो 

कधी एकमेकांवर रुसलो फूगलो 

समजूत काढत दोघ 

विवाह बंधनात अढकलो 


प्रेम विवाह नाव मिळाले 

पण लग्नानंतर मात्र 

माझे स्वातंत्र्य गळाले 


तु सतत ऑफीसच्या 

कामत व्यस्त 

मी रोजच आपली 

घरकाम करून अस्वस्थ 


माझी चिडचिड 

दगदग वाढत गेली

शेवटी इतर बायकांसारख 

मी ही राग राग केली


लग्नानंतर तु खूप बदललास

हे कॉमन डायलॉग मारली

स्वतःला सावरून परत

आपल्या संसाराची कास धरली


Rate this content
Log in