प्रेम म्हणजे प्रेम असतं...!
प्रेम म्हणजे प्रेम असतं...!
1 min
230
हुरहूर की
पुन्हा बेचैनी
तगमग ती
का जीवघेणी...!
ठोठावलेस
दार दिलाचे
साद घालूनी
मऊ शब्दांचे...!
रूनझुनली
पैंजन स्वर
प्रेम रसाचा
वाढवीं ज्वर...
नितळ डोळे
विशाल भाल
उमटें खळी
नाजूक गाल...!
केस बांधुनी
वेणी घातली
शुभ्र मोगरा
रुळें खुशालीं...!
माहीत नाही
ऋणानुबंध
का खुणावतो
आकृतीबंध....!
ईश्वर कृपा
अमूल्य देणं
तुझ माझ हे
सोबत येणं...!
खरे सांगतो
प्रेम करावे
जीवापाड ते
प्रेम जपावे...!
