प्रेम म्हणजे काय????
प्रेम म्हणजे काय????
1 min
390
जशी दुधात
घुळते साखर
आई पिल्लांना
खाऊ घालते भाकर
आईची माया म्हणजेच प्रेम
नदीचे निर्मळ
वाहते पाणी
झाडावर पक्षी
गातो गाणी
ते म्हणजेच प्रेम
वासराला पाहताक्षणी
गायीला फुटतो पान्हा
वाहणाऱ्या दुधाच्या धारा
म्हणजेच प्रेम
राधा मीरा यांनी
कृष्णावर निस्वार्थ
केलेली भक्ती
म्हणजेच प्रेम
