STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे काय असतं

1 min
219

प्रेम म्हणजे काय असतं 

शाळेत डबा विसरून जाताना

लेकरू उपाशी मीही जेवले नाही

आईच्या डोळ्यांतल्या धारा मोजताना


प्रेम म्हणजे काय असतं

आज लवकर घरी येतो म्हणताना

अहो आज तरी लवकर याल का

व्याकूळ पत्नीचा चेहरा पाहताना


प्रेम म्हणजे काय असतं

बाबा सर्कसला चला म्हणताना

रिकामा खिसा नको कळायला

आशेने लेकरे बाबांना विनवताना


प्रेम म्हणजे काय असतं

खडीसाखर हातावर टेकवताना

बोळक्या तोंडाचा आशीर्वाद घेत

आजीला प्रेमाने मिठी मारताना


प्रेम म्हणजे काय असतं

शिकायला बाहेरगावी जाताना

अश्रु लपवणाऱ्या बाबांचं असतं

मिठी मारून हूंदक्यात गदगदताना


Rate this content
Log in