STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

प्रेम म्हणजे काय असतं?

प्रेम म्हणजे काय असतं?

1 min
452

पाहता क्षणी मनात काहूर दाटणं

जसं निशेला रातराणीचं फुलणं

हेच तर प्रेम असतं


परत भेटीची ओढ असणं

जसं भ्रमराचे फुलांकडे आकर्षित होणं

हेच तर प्रेम असतं


सारखं त्याच्याशी बोलावसं वाटणं

जसं चंद्राला पाहून चांदणीचं लुकलुकणं

हेच तर प्रेम असतं


वेळप्रसंगी मदतीचा हात देणं

जणू दहन करण्या तिमिराला काजव्याचं चमचमणं

हेच तर प्रेम असतं


सतत तू येण्याची चाहूल लागलं

जसं चातकाचं पावसाची वाट पाहणं

हेच तर प्रेम असतं


सोबत जरी नसेल तू

तरी स्वप्नात माझ्यासवे असणं

हेच तर प्रेम असतं


एकमेकांच्या सुख-दुःखात एकञ असणं

आयुष्यभराच्या प्रवासात सोबत असणं

हेच तर प्रेम असणं


Rate this content
Log in