प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं
1 min
458
उघड्या पाठीवर झोंबणारा
गारा वारा झेलत
थरथरत्या हातात कंदील घेऊन
उंबरठ्यावर वाट पाहणं
*म्हणजे प्रेम असतं का ???*
कधीतरी अचानक एखादं
काळवंडलेलं जुनं नाण हाती लागावं
त्याच्याकडे बराच वेळ न्याहळत रहावं
कुठंतरी खरखरीत हाताचा
स्पर्श लागतो का पहावं
*याला प्रेम म्हणतात का ?????*
स्वप्नांची पालखी
आठवांचा थवा
बासरीत पुन्हा पुन्हा
तेच तेच स्वर
मंद स्पंदनात तुझीच आरती
याला म्हणतात का प्रेम
*हो हो यालाच म्हणतात प्रेम*
काही नाती बनत असतात
एकमेकांत गुंफत जातात
मनाच्या कोपऱ्यात घर करत असतात
अहो ...
प्रेम प्रेम म्हणजे याशिवाय आणखी काय असतं
