प्रेम म्हणजे काय असतं
प्रेम म्हणजे काय असतं
1 min
141
प्रेम अलंकार हा
वसंत ऋतूचा
बिल्लोरी आरसा
कोऱ्या प्रितीचा
प्रेम वात्सल्य
मायमाऊलीचे
आनंदी क्षण हे
साफल्य प्रितीचे
प्रेम भाव करुणा
धर्मशास्त्र नीतीचा
परोपकारी स्पर्श
झरोका प्रीतीचा
प्रेम ईश्वरभक्ती
शोभा राऊळाची
झंकारता वेणू
लय उठते प्रीतीची
प्रेम अमृतधारा
तीर्थ देह कुटीचे
तेथे लीन व्हावे
असे अर्थ प्रीतीचे
