STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

प्रेम म्हणजे काय असते?

प्रेम म्हणजे काय असते?

1 min
333

प्रेम म्हणजे काय असते

हृदयामधले अतूट बंधन

दोन जीव एकरूप असे

जणू तयांचे एकच स्पंदन.


प्रेम म्हणजे काय असते

मनात फुललेली भावना

आवडलेल्या व्यक्तीसाठी

हृदयातील गोड संवेदना .


प्रेम म्हणजे काय असते

भेटीसाठी अनावर ओढ

आठवण येताच गालात

खुदकन हसायची खोड.


प्रेम म्हणजे काय असते

होणे सर्व जगाचा विसर

रमत नाही मन कशातच

मनावर प्रेमाचाच असर.


प्रेम म्हणजे काय असते

निसर्गाची अनमोल भेट

नजरेतून बोलते प्रेम अन्

करते वार हृदयावर थेट.



Rate this content
Log in