प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे काय असतं
काही म्हणती येथे
तुमचं आमचं सेम असतं
पण काय माहिती
खरंच का तसे असतं ?
प्रेम तरी काय असतं..!!
डोळ्यातून पाझरून
मनात शिरतं
कधी ह्दयात ते फुलतं..
स्पंदनातून व्यक्त होतं
मग जीवनात शिरतं
गड्या प्रेम ते असतं...!!
कुणी जेव्हा हवंहवंसं
लय जवळचं भासतं..
त्याला मन जिथं तिथं शोधतं
ते दिसल्यावर हसतं
गड्या प्रेम ते असतं..!!
अंधाऱ्या रात्री ते जागतं
चंद्र ताऱ्यापरी भासतं..
वाऱ्यासंगे मग बोलतं
स्वप्न तेव्हा जे पाहतं
गड्या प्रेम ते असतं..!!
त्याला बंधन कुठे कळतं
नियमात कुठे अडतं
उच्च-निच्च भेद जेव्हा नडतो
त्याला ही ते फोडतं
गड्या प्रेम ते असतं..!!
प्रेम मागणं नसतं
देत राहणं असतं
अपेक्षा न ठेवता
सुख देणं असतं
गड्या प्रेम ते असतं.!!
कधी त्यागाचे उदाहरण
कधी सर्मपण असतं
एक भक्ती, तर जीवन असतं
दोन्ही ओंजळीत दिलेलं
परमेश्वराने ते वरदान असतं
गड्या ते प्रेम असतं
गड्या ते प्रेम असतं..!!
