STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

प्रेम म्हणजे काय असत...!

प्रेम म्हणजे काय असत...!

1 min
328

प्रेम रेल्वे रुळा सारख

निपचित पडलेलं

कधीही एक रूप न होणार

तरीही साथीन चालणार

साथीत राहणार

स्टेशनं अनेक येतात जातात

नाव रुबाबात मिरवतात

पण

युती मात्र होत नाही

प्रेमाची जातच ही वेगळी

ती कधीच कोणाला

कळत नाही

ती रुळालाही समजत नाही

स्टेशनालाही उमजत नाही

तरीही काही बिघडत नाही

साथ काही सुटत नाही

नात काही तुटत नाही....

प्रेम म्हणजे काय असत

ते कधी रेल्वे रुळा सारख असत

कधी भेटत नाही

कधी तुटत नाही

प्रेम म्हणजे नदी सारख असत

सदोदित वाहणार आणि

किनारा फुलवत जाणार...

प्रेम म्हणजे 

दूध साखरे सारख असतं

अवीट गोडीच आणि

कधीही विलग न होणार

खरेच प्रश्न मनास पडतो

प्रेम म्हणजे नेमकं काय असत?

उत्तर अगदी सोपं

प्रेम प्रेम असत

प्रेरक असणार ,प्रेरक ठरणार

प्रेरणा देणारं,प्रेरणा घेणार

मजबूत ठेवणार,मजबूत राहणार

मजबूत करणार, मजबूर होणार

प्रेम प्रेम असत ,दुसरं तिसर काही नसतं

हवं हवं वाटणार ते तेच ओरम असत....!


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை