प्रेम कुणावर करावे
प्रेम कुणावर करावे
प्रेम करावे कुणावर ?
खरे तर कुणीही कुणावरही
एकमेकांच्या दृढ विश्वासावर
आणि आपल्या देशावरही १
प्रेम करावे जन्मदात्यांवर
त्यांना मिळणाऱ्या आनंदावरही
त्यांनी दिलेल्या सुंदर जीवनावर
आणि त्यांच्या म्हातारपणावरही २
प्रेम करावे साऱ्या समाजावर
आणि मिटवावे दंगेधोपे सारे
शिंतोडे नकोच जातीय द्वेषावर
मग एकमेकांना समजून घ्यावे खरे ३
प्रेम करावे शुद्ध माणुसकीवर
माणसातील माणूसपणावरही
लक्ष हवे चांगल्या विचारांवर
म्हणजे चांगुलपणा दिसतोही ४
प्रेम करावे निसर्गावर
निसर्गातील नैसर्गिकतेवरही
आणि त्याच्या निर्मळ सौंदर्यावर
जीवनातील निसर्ग नियमांवरही ५
प्रेम करावे आपल्या देशावर
म्हणजे जवानांचे स्मरण होतेही
आणि अठरापगड जातींवर
म्हणजे आत्मीयता वाटतेही ६
आधी प्रेम करावे स्वतःवर
साधी राहणी उच्च विचारसरणीवरही
प्रेम करावे निरपेक्ष मित्रत्वावर
आणि मिळालेल्या सुखी जीवनावरही ७
