प्रेम करून तू बघ
प्रेम करून तू बघ
माझं खूप जीव आहे तुझ्यावर
तू ही माझ्यावर जीव लावून तरी बघ...
जिवापाड प्रेम करते तुझ्यावर
तू ही माझ्यावर प्रेम करून तरी बघ....
एकदा तरी नजरेत नजर घालून तू बघ
माझ्या डोळ्यातील प्रेमाला जाणून तू बघ...
तुझ्या मनाचा पिंजरा तोडून तू बघ
माझ्यात तुझ्या -हदयाला गुंतवून तू बघ...
एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवून तू बघ
निस्वार्थ प्रेमाला एक संधी देऊन तू बघ...
प्रेमात मोकळा श्वास घेऊन तू बघ
तुझी कायमची साथ मला देऊन तू बघ..
कधीतरी मनमोकळे हसून तू बघ
नदी किनारी माझ्यासोबत बसून तू बघ..
हातात माझ्या हात घालून फिरून तू बघ
माझ्यासारखे प्रेमात झूरूण तू बघ....
सगळे विसरून माझ्यात हरवून तू बघ
प्रेम नावाच्या जगात एकदा जगून तू बघ...
