प्रदूषित
प्रदूषित
जन्म जरी झाला, निसर्गाच्या कुशीत.
होय आम्हीच केले, इथले पानी दूषित.
मिळत नव्हते पानी, तेव्हा लागली आहे चिंता.
होत तेव्हा टिकवल नाही, बाकी राहील काय चिरंन्तर
अजूनही वेळ गेली नाही, मिळून सावरु सगळे.
लक्ष विचलित झाले, चित्र दिसेल वेगळे.
इंधन जाळून आम्ही, वेग आमचा वाढविला.
श्वासासाठी हवाच नाही, जन्मच हा घटविला.
प्रगतीच्या नावाखाली, अमाप तोडत आहोत झाडे.
अंत्यविधीसाठी सुध्दा, मिळणार नाहीत माडे.
प्रदूषित झाले सगळे, बाधित झालो आम्ही.
चला पुन्हाने बनवू सगळे, वाचऊ काळाची हानी.
