Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

2  

Chandan Pawar

Others

प्रदर्शन

प्रदर्शन

1 min
442

ज्येष्ठ पौर्णिमेला असतो

वडाचा पाहण्यासारखा "लूक";

पुढच्या सात जन्मासाठी

नवरोबा होतात "बुक"

दरवर्षी पौर्णिमेला वडाभोवती

बायकांचा घोळका असतो;

मनातून सांगावे, किती बायकांना

नवऱ्याचा पुळका असतो

पौर्णिमेच्या वडपूजेला असते

बेगडेपणाची "पॉलिश";

साता जन्मासाठी तोच नवरा

मागणे हा प्रकारच "बालिश"

कुणी ठेवतात तर कुणी

ठेवत नाही विश्वास;

वड न पूजणाऱ्या बायकांचे

नवरे घेतात मोकळा श्वास

नवऱ्यालाही आवडी-निवडी असतात

याचे असावे बायकांना भान;

"मागणी तशा पुरवठ्याचे"

गाऊ नये वडाभोवती गान

श्रद्धा किती? अंधश्रद्धा किती?

डोळसपणे पहाव्यात;

नुसते प्रदर्शन होईल

अशा गोष्टी टाळाव्यात

साता जन्माचे कनेक्शन

पाहून वडही थक्क आहे;

आपल्या वैचारिक सबलतेने

त्यास मनातून दुःख आहे

Rate this content
Log in