प्रातःकाळी
प्रातःकाळी
1 min
195
मानव जन्म तुला लाभला
अमोल रत्नांचा घडा
आता करू नको अतिलालसा
खोदू नकोस तू पाप पीडा
वास्तवाचे भान ठेव रे
जुनाट बुरसट सोडून दे
तुझ्यामुळे न का कुणी गांजले?
त्यास स्पर्शूनी वेचून घे
नवचैतन्याने सृष्टी नटते
आभाळी सूर्य जरा येता वरी
या संदर्भाने पुढे चालता
तुझे कुणी ना वैर करी
जे झिरपते तेच साठते
निसर्गाची तर हीच तऱ्हा
बाग तयांवर फुलवित जाता
येऊ लागते पुण्य फळा
ये माणुसकीचे बंध आवळू या
गोड उषेचे वस्त्र विणू
जे जे असती उदात्त उत्तम
प्रातःकाळी मंत्र म्हणू
