प्रारंभ
प्रारंभ
कोणीतरी जातय आयुष्यातून, म्हणून थोड भयाण वाटतय.
आठवणींच कितीतरी ओझ, मनाच्या गाभाऱ्यात साठतय.
चालू वर्षे संपून, सुरू होईल पुन्हा एक नवीन सुरवात.
मेहनतीच्या जोरावर, पुन्हा करू सर्व संकटावर मात.
नवी स्वप्न नवे संकल्प घेऊन, उतरू पुन्हा मैदानात.
प्रयत्नांची पराकाष्टा, प्रतिकार आणू कामात.
नव्या वर्षाची नव्या कामाची, मुहूर्तमेढ रोवली.
आशीर्वादाच्या रूपाने पाठी सदा, थोरा मोठ्यांची सावली.
संकल्प घेऊन जिंकण्याचा, वाटा आता शोधत आहे.
चुका नेमक्या काय काय झाल्या, थोडा मागे वळून पाहे.
नवीन वर्षे, नवा संकल्प जीवनाचा.
मार्ग पादाक्रांत करण्या, प्रारंभ नव्या युगाचा.
