प्राण्यांचे क्रिकेट
प्राण्यांचे क्रिकेट
प्राण्यांनी ठरवली एकदा
क्रिकेटची छान मॅच
क्रिकेटसाठी निवडला
हिरवळीचा सुरेख पॅच.....
दोन्ही टीमचे कॅप्टन
आले टाॅस करायला
गेंडामलने टाॅस जिंकला
डुलत आला तो बॅटिंगला.....
जिराफ आला मैदानात
मारली मस्त चौकार
प्राण्यांनी एकच गलका केला
वन्समोअर, वन्समोअर...
हत्तीदादा आला बॅटिंगला
मारला जोरदार सिक्सर
नेमका त्याचवेळी घरी
घरघरला मोठ्याने मिक्सर....
दोन चौकार मारून दमला
जिराफ दादा झाला आऊट
शेजारच्या मैदानावर तो
पाहू लागला आता स्काऊट....
कोल्हा व लांडगा यांना
हवी होती खेळायची संधी
मैदानाच्या आतच यायची
दोघानांही होती पाबंदी....
हरिणदादा झाला होता
विजेता "मॅन ॲफ मॅच"
हरिणदादाने घेतले होते
चांगले पाच,पाच कॅच....
