STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

प्रामाणिक शांतता

प्रामाणिक शांतता

1 min
410

कधीच वाटलं नव्हतं 

जीवनाचं रुप इतकं 

प्रखर असेल......

तळपत्या सुर्यापेक्षाही

लख्ख काळोखापेक्षाही

आभाळभर आयुष्यालाही

जपण्याची भिती असेल...

कधीच वाटलं नव्हतं 

विस्कटल्या पानांना सावरताना

उडणार्या केसांना आवरताना

खिडकीची उघडझापही

इतकी जीवघेणी असेल...

कधीच वाटलं नव्हतं 

कृत्रिम वाटणारी शांतता 

इतकी प्रामाणिक असेल

विझुन पेटणार्या वातीसारखा

जीवनाचा श्वासही विश्वासाने

फडफडत असेल....

कधीच वाटलं नव्हतं 

नियती इतकी क्रुर असेल

समुळ नष्ट करण्या ही आपत्ती 

देवाचं दारही बंद असेल.....

आपणच आपल्याला धीर द्यायचा 

सुजाण माणसाचीही..

केवलवाणी परिस्थिती असेल..!       


Rate this content
Log in