प्रामाणिक पणा...!
प्रामाणिक पणा...!
सद्गुण,सद्विचार,
प्रामाणिकपणा अशा गोष्टी आता
बाजारात विकल्या जात नाहीत
आणि विकत मिळत ही नाहीत
आपण प्रामाणिक आहोत
हे हल्ली कमीपणाच लक्षण वाटत
जनमानसात ते न चालणार
एक खोट नाणं वाटतं
पूर्वी इज्जत ही
प्रामाणिक पणाला मिळायची
सद्विचाराला मिळायची
सदाचाराला मिळायची
पण आता
या गोष्टींची अपेक्षा
स्वप्नातही करवत नाही
प्रामाणिक पणाचे बोल बोलण्यास
मन ही धजावत नाही
कारण प्रामाणिक पणा
आणि सत्य ह्या
साक्षेपी संज्ञा आहेत
त्या खऱ्या अर्थाने
बहुमताच्या बंदिनी आहेत...!
समजा शंभर जणांनी सूर्य नाही म्हंटले
तर सूर्य नाही हेच सत्य असते
कारण
सत्य प्रकाशात येई पर्यंत
असत्य गावभर बोंबलून आलेले असते
आणि मग
सत्य अंधत्वाचे झापड लावून बासनात बसते
तोवर बरेच पाणी पुला खालून जाते
म्हणून
असे कधी कधी वाटते
प्रामाणिक पणासारखी अमूल्य गोष्ट
अपेक्षणे ही रेतीतून सुई
शोधण्या सारखे आहे
मुळात या अमूल्य गुणांची
आस धरणेच जणू व्यर्थ आहे
सत्यमेव जयते
हे वैयक्तिक सौख्य आहे
ते आपणा जवळ आहे
हेच खरे सौभाग्य आहे....!
