STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

प्रामाणिक कुत्रा

प्रामाणिक कुत्रा

1 min
12.7K

आमच्या गल्लीतला कुत्रा गल्लीतच राहतो 

उगाच याच्या त्याच्या वर भुंकत राहतो 

मी काही विशेष केलं हे मिरवित 

राहतो 

दिवसभर गेटसमोर पहारा देत राहतो 


गल्लीतल्या प्रत्येकाला आपला मालक मानतो 

कोणीही आलं तरी त्याला चाटत राहतो 

कोणी जात असेल तर थोड्या दूरपर्यंत सोबत येतो 

आपली प्रामाणिकता सर्वांना दाखवित असतो 


गल्लीतले लोक त्याला उरलेले खाऊ घालतात 

तो कधी कोणाला काहीही मागत नसतो 

तरी अंधाऱ्या रात्री तो जागत असतो 

नविन कोणी आलं तर भुंकत असतो 


प्रामाणिक आणि विश्वासात तो राहतो 

कुत्रा घराची राखण करतो 

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता 

आपल्या धान्याचे प्राण वाचवतो 


गल्लीतल्या सर्वांच्या जीवनातील 

हा एक अविभाज्य भागच झाला आहे 

असा हा इमानदार, गुणी कुत्रा 

गल्लीतल्या सर्वांचा आवडता आहे. 


Rate this content
Log in