STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

प्राक्तन रेषा

प्राक्तन रेषा

1 min
166

पाचवीलाच पुजलेली सटवाई

नवजात बाळासाठी प्राक्तन रेषा ओढते त्याच्या कपाळी


गावा गावात मंदिर तीच

शाळुकेला शेंदुराने फासलेलच दिसत


लोक भावनांचा आदर करत

जोपासल्याय जाताय परंपरा 


गरीब श्रीमंत भेदभाव नसतो तीथे

बाळांच्या स्वास्थासाठी झटतात सारे


मंदिर जिर्णोध्दाराच्यावेळी ठरले

गाववर्गणीतुनच अष्टधातुची मुर्ती तयार करण्याचे


कविमनाच्या मुर्तीकाराने

सटवाईची मुर्ती साकारली छान


आईचे ते प्रसन्न भाव 

चेहर्यात उतरवले मन लावुन


बाळाला मांडीवर खेळवत स्वहस्ते मोरपिसाने 

ओढतेय ती प्राक्तन रेषा बाळाच्या कपाळी खास


अदृश्य शक्तीला दगडात पाहात होतो नेहमीच

मुर्ती रूपात पाहता मन स्वतःतच हरवले जात


नविन मंदिरात जुन्या पारंपारिक शाळुका

अन् सटवाईची मुर्ती भुषणावह आहे गावाला


मंदिराचा मोठा हॉल वापरला जातोय

गाव प्रबोधन, सार्वजनिक कार्यक्रमाला


मंदिर, नुसतच मंदिर नाही

तर आहे गावाची नवयुगासाठीची भुषणावह प्राक्तन रेषा


Rate this content
Log in