प्राजक्ताचा सडा
प्राजक्ताचा सडा
1 min
458
पारिजातकाचा सडा
बहरला अंगणात!!
शुभ्र फुले पसरली
फुले कोमल मनात!!
देहभान विसरले
अश्या सुंदर पाकळ्या!!
रंग केशरी पांढरा
उचलल्या सर्व कळ्या!!
हार माळिला देवाला
गुंफुनिया सर्व फुले!!
पूजा करेन भक्तीने
मन माझे आज डुले!!
सुंगधाने प्राजक्ताच्या
मोहरली सर्व काया!!
स्पर्श नाजुक कोवळा
देई देही अशी छाया!!
जन्म पारिजातकाचा
त्याग भाव सर्मपण!!
आयुष्याचे कोडे जसे
प्राण आहुती अर्पण!!!
