पोवाडा
पोवाडा
ऐका सांगतो शाहीर तुम्हासी
राजा शिवरायाची हो ख्याती
जुलूमास ठोकली ज्यांनी नाल
धडावर पेलली हो ज्यांनी तलवार
यवनाचा होता हो तो काळ
जिरं हा जी जी जी जी जी...
बेजोड शिवनेरी किल्ल्यावरी
पुत्र जन्मला भोसल्यांचे घरी
कृपा जाहली शिवाई देवीची खरी
अतिसुंदर शिवाजी हो बाळ
गर्जू लागला सह्याद्री पहाड
बांधली स्वराज्याशी त्यांची नाळ
जिरं हा जी जी जी जी जी...
माँ जिजाऊचा पराक्रमी तो छावा
खेळू लागला दांडपट्ट्याला
हाती धरून फिरवी तलवारीला
लागला मातीचे किल्ले बनवायला
शिकू लागला राज्यकारभाराला
जिरं हा जी जी जी जी जी
राजे मयूर सिंहासनी
बैसले
तोरण्यास राजधानी बनविले
अष्टप्रधान मंडळ नेमिले
सगळे जात धर्म एक करविले
घेतला त्यांनी स्वराज्याचा ध्यास
राज्याभिषेकास बोलविले गागाभट्टास
जिरं हा जी जी जी जी जी
दिल्लीच्या यवनांस झुंजविले
अफजलखानाशी बेमौत मारीले
शाहिस्तेखानाची बोटे तोडीले
औरंगजेबास पाणी पाजिले
गनिमी काव्याने शत्रूस हरविले
रयतेचे हिंदवी राज्य स्थापिले
जिरं हा जी जी जी जी जी...
राजा शिवरायास मुजरा करा
छत्रपतीने शिकविला राजधर्म खरा
आदर्श अशा राजास हो स्मरा
त्यांच्या गुणांना वरू या चला
डोळ्यात स्मृतीचे अंजन या भरायला हो
जिरं हा जी जी जी जी जी...