पोस्ट पत्र
पोस्ट पत्र
1 min
249
15 पैशाचे पोस्ट पत्र,
खुशाली कळवत होतं,
अर्ध लिहीलेलं पत्र,
रडायला लावतं,
एक रुपया सुट्टा घेऊन,
एसटीडीच्या लाईन मध्ये,
उभा राहतो होतो,
फोन लागला की,
मन भरून येत होतं,
whatsapp वर,
24 तास संपर्कात राहतोय,
ना ती ओढ आहे,
ना ती हुरहुर,
काळ बदलला बदलली साधने,
मी अजूनही जिव्हाळा शोधतच आहे,
25 हजारांच्या मोबाईलला,
15पैशाची सर नाही.
अजून काय काय बदलेल,
पण ते दिवस,
ती माया,
ती आपुलकी,
पुन्हा कधीच मिळणार नाही.........
