STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

पोशिंदा...

पोशिंदा...

1 min
76

रातंदिन कष्ट करी

म्हणती तुला शेतकरी 

तू तर साऱ्यांचा पोशिंदा 

धरू नको फाशीचा फंदा


काळ्या काळ्या मातीतून 

पिकविशी अन्नकण 

तू तर अल्लाचा बंदा

धरू नको फाशीचा फंदा


तळपते माथी ऊन

निराशेचे येती क्षण 

मेघ बरसतील यंदा 

धरू नको फाशीचा फंदा


नको रडू नको कुढू

धीर नको असा सोडू

काळी आई पिकेल पुन्ह्यांदा

धरू नको फाशीचा फंदा


म्हणती तुला बळीराजा 

परि नसे गाजावाजा 

बळकट असे तुझा रे खांदा

धरू नको फाशीचा फंदा


खिल्लारी ही बैलजोडी 

घुंगुरमाळा पायी तोडी

कानी पडू दे या नादा

धरू नको फाशीचा फंदा


मुखी पडावे चार घास 

तुझी साऱ्यांना असे आस

परतवुनी आण या आनंदा

धरू नको फाशीचा फंदा


Rate this content
Log in