STORYMIRROR

Vijay Deshpande

Others

3  

Vijay Deshpande

Others

पोरगी ती दूरदेशी शिकत आहे- गझल

पोरगी ती दूरदेशी शिकत आहे- गझल

1 min
27.6K


पोरगी ती दूरदेशी शिकत आहे 

घास ओठी का हिच्या पण अडत आहे..

पीक नाही थंड आहे चूल जरी ती 

आत्महत्येचा विचारच शिजत आहे.. 

जीवनाला अर्थ ना पैशाविना या  

औषधावाचून तेही रडत आहे..

शब्दही आधार ठरतो निर्धनाला  

शब्द विकुनी पोट त्याचे भरत आहे..

खायला विष आज कोठे फुकट मिळते 

कोरडी भू आसवांनी भिजत आहे.. 

तीनदा हुलकावण्या देऊन झाल्या 

न्यायला आता किती यम दमत आहे..


Rate this content
Log in