STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

पोलिसमामा

पोलिसमामा

1 min
11.7K

टाॅक टाॅक बूट वाजतात,

अन खाकी पोषाख टाईट!

छोटी बंदुक पाॅकेटमध्ये,

काय भारी हो तुमची ऐट, 


चोर, भामटे, चीत करता, 

त्यांना मारून एक फाईट, 

अद्दल घडवता चांगली,

कोणी जर का केले वाईट!


जीपचा सायरन ऐकता,

सारे गुंड पळून जातात, 

सांगून ऐकलं नाही तर, 

दांडूक्याचा फटका खातात!


मस्ती कधी मी करतो तेव्हा,

आई रागात धमकावते, 

"पुन्हा गडबड केलीस की,

"पोलीसमामांना बोलावते!"


समाजाचे हे खरे सेवक, 

मदतीला सज्ज असतात,

अभिमान वाटतो आम्हाला,

कायद्याची रक्षा करतात!


Rate this content
Log in