पोकळ बांबू
पोकळ बांबू
1 min
248
दिसाया पांढरा पण
काळजात काळा
नेहमीच ठेवतोय
माशावर डोळा
पाय त्याचे लांब
जसा दिसतोय लंबु
आतून सारा असे
पोकळ बांबू
बगळ्यांची चोच
जशी टोकदार
नदीतील मासे त्याला
आवडती फार
रंगावर बगळ्याच्या
कावळा झुरतो
साबणाने पंख कसे
घासायला पाहतो
डोळे मिटून उभा
पाण्यात राहतो
मासे जवळ येताच
पटकन गिळतो
असा धूर्त बगळा
नको संगतीला
बगळ्यांची मैत्री
नको कावळ्याला
