पणती
पणती
1 min
706
माती घेऊन पणती
बनवली चाकावरी
दिप उजळले मनी
नंदादीप घरोघरी
गरगर फिरे चाक
दिवा घडवत जाई
दिवाळीचा हा उत्सव
उगवता सुर्य पाही
रात्रंदिन कष्ट करी
घडवण्या तो पणती
दिवा मातीचा करुन
उजळवी स्नेह नाती
थेंब ते घामाचे पहा
हातावर घेत राही
दीपमाळ बनवूनी
नंदादीप विकी बाई
कुभांरच्या ही घरात
दिवाळीचे सुख देऊ
आनंदाने दिवाळीही
उत्साहात हो साजवू
करु साजरी दिवाळी
मातीच्याच या दिव्यानी
काढू मोडीत विदेशी
ज्ञान देशी स्विकारुनी
