पणती🙏🌹🙏
पणती🙏🌹🙏
इवलीशी पणती
असे जरी मीनमिनती
दाखवी जगाला उपयोगी
काळोखात जळते एकटी।
असे मान तिचा दरवर्षी
आमवसेच्या लक्ष्मीपूजनाला।
भाव भक्तीच्या मंदिरात
देवाच्या पायाशी स्थान शांतीचे प्रतीक तिला।
नाही कधी घमेंड तिला
लोकांच्या येतो आपण कामी
जळते सगळ्यांसाठी पण
अंधार मात्र तिच्याखाली।
रांगोळीवर प्रकाश शोभून
दिसे उदार पणतीचे मन ।
मूर्ती लहान कीर्ती महान
उपयोगी पडे तिला म्हण।
अज्ञान रुपी अंधाराला लावते ती पळून।
असले जरी कोणी लहान
तुच्छ त्याला समजू नये अशी शिकवण
मानवाला देऊन जाते उदारतेच्या
निस्वार्थी ज्योतीने जळून
निस्वार्थी ज्योतीने जळून
