पण काही गावं हाल सोसती
पण काही गावं हाल सोसती
हिरवी धरा हिरवी शेती गावाची
डोलती झाडे झुडपे शेती गावाची
जपतात नाती गोती माती गावाची
खेडोपाडी सुंदर पक्षी गाती झाडावरती
थै थै करुनी मोर नाचती बागडती
कोंबडया, बकऱ्या, मेंढया गावात राहती
गायी,बैलं,म्हशी,रेडे हंबरती , चरती
कुत्रे,मांजरी शेताची,घराची राखणं करती
पण अजुनंही खरा शेतकरी
खरा पोशिंदा गावाकडे उपाशी
पण अजुनंही काही खेडो पाडी
विजेचा लंपंडाव चालती
पण अजुनंही काही खेडी पाडी हाल सोसती
धरणं बांधले खेडया पाडया जवळी
सारे पाणी शहराकडे वळवती अशी मती
भगिनी माझ्या पाण्यासाठी पायपीट करती
कुढली सुविधा, कुढला न्याय, कुठली नीती
मंत्री जंत्री साहेब सारेचं मतलबी नीती
भांडाभांडी, गाठीभेटी, माजते स्रीमंती
प्रत्येक खेडोपाडीचे व्हावे राळे गन सिद्धि
प्रत्येक खेडोपाडी असावे एक अन्ना हजारे सोबती
