STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

पंखात बळ आले

पंखात बळ आले

1 min
321

दोन चिमुकली पाखरे

आपल्याच घरट्यात

फडफड करत होती

बाहेर चोच काढून

खायला काही तरी

ती मागत होती

तिची आई देखील

दूरवर उडत जाऊन

पिलासाठी काहीतरी 

खाऊ आणत होती

असे काही दिवस चालले

एके दिवशी त्या घरट्यात

कोणीच दिसत नव्हते

पंखात बळ आले म्हणून

ती पिले आपली पोट

भरण्यासाठी उडून गेली

आजकाल माणसाचे आयुष्य

देखील या पक्ष्यांप्रमाणे झाले

लेकरं शिकून मोठी झाली

चार पैसे कमावू लागली

की त्यांच्या पंखात बळ येते

नि आई बाबाला घरात ठेवून

परदेशात नोकरी करायला

चालली कायमची जसे

पाखरे उडून गेली कायमची

कित्येक दिवस वाट पाहतात

डोळ्यातील अश्रू आटून जातात

पण ती पाखरे पुन्हा त्या

घरट्यात परत येत नाहीत ......

कधीच परत येत नाहीत ......!


Rate this content
Log in