पंखा
पंखा
1 min
273
अर्ध शतकांपूर्वी
कुठं होते हो पंखे?
नैसर्गिक थंड हवा
व्हरांडी घेत अख्खे..1
नववधू सासरी येई
बीजना येई बोरोण्यात
बीजनाच पूर्वीचा पंखा
असे गर्मीत हातात..2
तद्नंतर टेबल फॅन
पहिल्यांदा बहू मान
अपवादात्मक दिसे
प्रसन्न होई याने मन..3
लागले सिलिंग फॅन
ग्रामीण अन् शहरात
त्याहुनी आनंद मस्त
बहुतेकांच्या घरात..4
राहणीमान उंचावले
आता एक्झास, कुलर
थंडगार मस्त हवेनं
व्यापलं घर सारं..5
येथेच न कुणी थांबला
एसी आला खोलीत
वाट बघा भविष्याची
पुढे काय-काय येतं?..6
