पंढरीची वारी अभंग
पंढरीची वारी अभंग
1 min
43
पंढरीची वारी / ज्याचे ज्याचे घरी
साक्षात भूवरी / स्वर्गसुख
आणिक सायास / लागने ते त्यांना
विठ्ठल तयांना / सांभाळील
दिनाचा सोयरा / पांडूरंग माझा
सत्संग तो तुझा. /. दिन रात
सांभाळले जीवा / पाप पुण्या माप
दुष्कर्म आमाप / नित्य वारी
दुष्काळ कोरडा / शेतकरी जीवा
साद द्यावी देवा / नित्य वेळी
गरीबांचा काळ / तू थांबव आता
मदत करता / धावून ये
संतांचा उद्धार / केला तू जगात
शेतकरी घात / करू नको
