।।पंचशील बुद्ध।।
।।पंचशील बुद्ध।।
ऐहिक धर्माच्या सानिध्यात येतो
कोण कोण या स्वर्गमयी सुखाला
तथागत बुद्धांची शिकवणी घ्याया
निर्वाण आचरणी विसरा या दु:खाला।।।।
चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका
चित्तास निर्मळ ठेवा आपण
चार आर्यसत्यांचा अंगीकार करा
निर्वाणाचा साक्षात्कार करा आपण।।।।
पंचशील तत्व अंगीकार करा
जीव हिंसे पासुन अलिप्त रहा
चोरी करण्यातासुन दूर रहा
खोटे बोलण्यापासुन मुक्त रहा।।।।
अनाचारापासुन विलग राहूनी
कामवासनेचा त्याग करा
खोटे बोलणे पाप आहे
सम्यक संकल्प पुर्ण करा।।।।
मादक पदार्थ मद्याचे सेवन व
मोहांत पाडणाऱ्या वस्तुचा त्याग करा
तथागत बुद्धांची शिकवण ध्यानात
सम्यक दृष्टि व सदाचाराचा मार्ग धरा।।।।
निसर्ग नियमा विरुद्ध राहून
कोनतीही गोष्ट न करावी
योग्य निर्धाराने विचार करून
सम्यक संकल्प पुर्ण करावा।।।।
करुणायुक्त व सत्यपुर्ण वाणी बोला
वाईट मार्गाने उपजिविका न करावे
उत्तम कर्म योग्य कृत्ये करून
सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावे।।।।
नमो बुद्धाय म्हंटल्याने नाही
तरणार हो सारे आपण
ते कृतित उतरवा जीवनात
तेंव्हा चीत्त प्रसन्न होवून
आयुष्यात शांती मिळेल।।।।
