STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

पंचगंगा तीर...!

पंचगंगा तीर...!

1 min
428

पंचगंगातीरी....!!!


कुंभी कासारी भोगावती

तुळशी गुप्त सरस्वती

या पाच जणींची होता एक मती

वाहते पंचगंगा ओघवती


करवीर क्षेत्री प्रयाग चिखली

तीर्थ स्थान महा पवित्र

तेथूनच वाहते पंच गंगा

एकीचे मिरवीत एक सूत्र


सुजलाम सुफलाम करीत

दुथडी भरून वाहते संथ

तिच्या तीरी सुपीक भूभाग

घेऊनि सवे अनेक पंथ


निर्मळतेची ही जणू खाण

ठेवीते आमची उरात जाण

आम्हा नाही काही वाण

पंचगंगा असे आमचा प्राण...!!!


Rate this content
Log in