पळस...!
पळस...!

पळस.....!
पळस म्हणताच
अगदी पहिली पासूनचे
दिवस सारे आठवतात...
कारण त्याकाळी
अंगणवाडी बालवाडी
प्ले ग्रुप लोअर के जी,
अप्पर के जी वगैरेचे फॅड नव्हते
म्हणून वय झाल्याचे
दाखले सारे बहुदा आठवून देतात..
पळसाला पाने तीन
हे नविसरणार सत्य
आवर्जून पुन्हा पुन्हा सांगतात..
जंगलात हेच फुललेले पळस
आगीचा भास घडवतात
आपल्याला खुणेसाठी
दर्शन लांबूनच देतात...
मला मात्र पळस
वडिलांची आठवण करून देतो
आणि जीवनातले सत्य
सारखे मनावर बिंबवतो...
पळासाची तीन पाने हेच सांगतात
शेतात खत,बाजारात पत आणि
घरात एकमत असेल तर
जीवनात कमी काही पडत नाही
गाडी जीवनाची कधी
रुळावरून घसरत नाही...
आजही ते पटते
जे पळसाला पाने तीन
हे समजावून बाबा सांगायचे
आणि
सृजनशील जीवनाचे
बाळकडू पाजायचे....!
