पळस
पळस
1 min
197
वसंत ऋतूची
चाहूल लागली
चैतन्याची मग
लाट पसरली
शुष्क तरुलाही
फुटली पालवी
सकल सृष्टीचे
मळभ घालवी
पळस फुलला
तांबूस पिवळा
रंगाऱ्याने जणू
रंग उधळला
पळस फुलांचा
रंग पंचमीला
साल उपयोगी
असे औषधीला
झाली पानगळ
वृद्ध दिसे, परी
केशरी रंगाची
शोभा भरजरी
उद्याची काळजी
कधी न करावी
पळसाकडुनी
शिकवण घ्यावी
