STORYMIRROR

Priti Dabade

Others

4  

Priti Dabade

Others

पक्षी

पक्षी

1 min
87


कोंबड्याच्या आरवण्याने

होई सकाळची सुरुवात

नजर तीक्ष्ण गरुडाची

भरारी घेई आकाशात


चातकाची तहान

वाट पाही पावसाची

चिवचिव करत उडण्याची

घाई चिमण्यांची


मोरपिसारा नक्षीदार 

करे नयनांना मोहीत

कावळ्याची कावकाव

जीव होई भयभित


मिठूमिठू बोले पोपट

मिरचीवर डोळा त्याचा

काय महिमा वर्णावा

कोकिळेच्या व्रताचा


किडे, मासे शोधत

बदक पाण्यात संचार करी

कबुतराचे गुटरगु ऐकण्यात

येई मजा खरी


Rate this content
Log in