पक्षी चांगले या माणसांपेक्षा..
पक्षी चांगले या माणसांपेक्षा..
..एकदा चिमणी बोलली अरे दादा कावळा...
मी पाहा मस्त गोरी ती तु तर सावळा...
...कावळा म्हणाला पक्षी आपण
बरं झालं माणुस नाही तु नी मी पण....
..काल मी उडत उडत मानवी वस्तीत होतो गेलो
नी विदारक त्याचे जिवन पद्धत पाहुन मी खुपचं ग भ्यालो...
..इथं बेवडा नवरा लेकरांची काळजी घेत नव्हता..
कुणी धनिक गुरुजांना मदत देत नव्हता...
...लोक विनाकारण एकमेकांशी भांडत होते
नी रस्त्यावर त्यामुळे पाण्यासारखे रक्त सांडत होते...
...कुणी कुणाशी नाहीत यांच्यात संलग्न
प्रत्येक जण होते स्वतःच मग्न...
.. तरुण मुल कानात मोबाईल लावुन चालत होते
नी रस्त्यावर मुलींना पाहुन लज्जास्पद किळसवानं वाटल अशा भाषेत बोलत होते ..
.. म्हणुन चिऊताई आपण या जंगलातच राहु
मी जे बाहेरचे जग पाहुन आलो ते तु तर नको पाहु....
