पक्षी भविष्याचे साक्षी
पक्षी भविष्याचे साक्षी
सुंदरबनात एकदा भरली शाळा,
पक्षी झाले शिक्षक अन् माणसं झाली गोळा.
कोकिळेचा आहे गोड गळा,
म्हणे प्रत्येकाने स्वच्छता पाळा.
मोराचा नाच खूूप छान,
म्हणे मोठ्यांचा करा मान.
घुबड करी घू घू,
म्हणे इतरत्र नका थुंकू.
घार उडे निळ्या आकाशी,
म्हणे वागा प्रेमाने सर्वांशी.
कोंबड्याच्या डोक्यावर सुंदर तुरा,
म्हणे गरजुंना मदत करा.
काव काव करी कावळा,
म्हणे वाहतुकीचे नियम पाळा.
झाडावर बसला चिमण्यांचा थवा,
म्हणे प्रत्येकाने झाड लावा.
मिठू मिठू करी पोपट,
म्हणे टाळा जंंकफूड तेेेेलकट.
चातक असतो आतूूूर पावसाला,
म्हणे अंधश्रद्धेला आळा घाला.
अशी सुंदर निसर्गाची किमया,
पक्षी आले माणसा शिकवाया.
असे सर्व बुद्धिमान पक्षी,
ठरणार ते भविष्याचे साक्षी.
