पक्षांतर (वात्रटिका)
पक्षांतर (वात्रटिका)
1 min
14.3K
श्रीमंतांचेच बंगले बनतात
गरीब राहतोय झोपडीत
पुढारी करतात पक्षांतर
एकातून दुसऱ्या उडीत
नेत्यांना सत्तेची लालसा
सतावते खुर्चीची हाव
जनता म्हणते परमेश्वराला
देवा मला आता तरी पाव
सामान्य गेला भरडून
जनता गेली करपून
या पक्षांतराच्या आगीत
भारत गेला होरपळून
