पिवळ्या रानफुला!
पिवळ्या रानफुला!
1 min
213
- पिवळ्या रानफुला बघ कसा वाराही तुला भुलतोय
- डोगररांगा रानोमाळी भटकून मग तुझा भोवती भिरभिरतोय.
- पिवळ्या रानफुला अभिषेक कोवळ्या किरणांचा तुला केला सूर्याने
- पाहुन ती चकाकती झळाळी मान टाकली सोन्याने
- पिवळ्या रानफुला तू बालीश,नाजुक सुकुमार
- धरतीने पसरली चादर पहुडणया तुला हिरवीगार.
- पिवळ्या रानफुला तुझ्य
- रंगाचा श्रृंगार
- अमृताचा अभिषेक करूनि वर्षाराणीने वाढविला निखार
- पिवळ्या रानफुला तुझे ताटवे पसरले चहूकडे
- डोळयात किती साठविले मन माझे नाही भरले
- पिवळ्या रानफुला वैभव तुझे हे ठेव जपुन असेच जे बहाल केले तूज निसर्गाने.
- पाहीन दुरूनच तुला मी गात राहीन आनंदाचे गाणे.
