पिंजरा
पिंजरा
1 min
299
निपचित पडलेला देह
गालावर ओघळतेे अक्षृ
तिचेे अजाण
बालक ते
पहात होते
आपल्या चिमुकल्या
हाताने आईचे
आसु पुसत होते
कधीही न
उघडणाऱ्या
विवाहरुपी
पिंजऱ्यात
ती अडकली होती
मन मारुनच
कशीबशी जगत होती
मनात दुुःख असुनही
खोटेे हसु आणित होती
सासरच्या सर्वांंचाच
त्रास शोषित होती
पण नवऱ्याने
जेव्हा हृदयावर
वार केला तेव्हा मात्र
मुळासकट कोलमडून
पडलेेल्या वृृक्षाप्रमाणे
मनात असलेल्या
प्रेेेमासकट
उद्धवस्त
झाली होती
आणि
स्वतः लाच
विचारत
होती
कधी या
पाशातुन
सुटणार मी?
असा विचार केेलाा
तरीही
माझ्या
बाळासाठी
जगणार
आहे मी
पण या
विवाहरुपी
पिंजऱ्यातच
अडकणार
आहे मी
