पिंजरा
पिंजरा
1 min
313
घराचा झाला पिंजरा आता
आशा कोणी दाणा-पाणी देणार
छोट्याश्या या पिंजर्यात
नात फुलवणार कि नात तोडणार?
'तो' व 'ती' फक्त
नर नारी म्हणुनच
एकमेकांना पाहणार की
माणूस म्हणून जगणार?
पिंजऱ्यात राहून आनंद घेणार
विसरून चाललेल्या स्वावलंबनाचा
स्वनिर्मितीच्या नव कक्षा वाढवणार
स्वशोधनाचा ध्यास घेणार?
