फूलपाखरू
फूलपाखरू

1 min

23.7K
फूलपाखरू मी असे स्वच्छंदी,
जगणे ही माझे असे आनंदी.
असे मी किती विविधरंगी
मोहविण्याची कला जपली मम अंगी.
फुलाफुलांवर भिरभिर माझी,
बागडताना असे मी मनमौजी.
आयुष्य आहे छोटेसे जरी,
जगणं असते उत्साही भारी.
हीच आहे गंमत खरी,
जगण्याची ही रीतच न्यारी.