STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

फुलतो वसंत

फुलतो वसंत

1 min
229

शिशीरातली बोचरी थंडी झेलत उभा होता।

वसंताच्या आगमनाची प्रतिक्षा करत होता ॥


ठाऊक होते त्याला काहीच नव्हते त्याच्या हाती।

डोईवर आभाळ निळे अन् पायाखाली माती॥


उरले किती जीवन , ह्याचीही नव्हती गणती ।

अंतरामध्ये होती धुगधुग , जणू क्षीण जळती पणती॥


कार्य संपले माझे इथले, ही नसे शाश्वती जीवा।

आयुष्याच्या संध्याकाळी कोणा , 

सोपवायचा आहे दीवा॥


हीच भावना अंतरी बाळगत, जगतो हा रात्रंदिनी।

झुळूक वसंताची जाते स्पर्श करुनी त्या एका क्षणी॥


बदलतो चेहरामोहरा , बदलतो रूपरंग हा।

सगुण , सात्त्विक , पीतांबराचे

पांघरतो उपरणे अहा॥


जनकल्याणासाठी धावून येई जसा पांडुरंग पंढरी।

भार विश्वाचा झेलण्या फुलला पांगारा धरेवरी॥


सोनेरी मुकुट लेऊन शोभतो ऋतूराज हा।

नच विसरला भूमातेला , चढवी तिला सृष्टीसाज हा॥ 


Rate this content
Log in