फुलराणी
फुलराणी
वाट नको पाहू तुला शाबासकी देईल कुणी
ओळख तुझे सामर्थ्य तूच आहेस फुलराणी
फुलराणी असते फुलांची अनभिज्ञ सम्राज्ञी
तूही कर वर्चस्व अन सोडून दे ही ग्लानी
फक्त बांगड्यांसाठीच नाहीत हात तुझे खुले
दाखव जगा बळ तुझ्या कणखर मनगटातले
चूल अन मूल या पलिकडे गेलीस तू केव्हाच
आभाळाला घाल गवसणी सारे करतील हेवाच
पुरुषप्रधान संस्कृतीशी आहे तुझा लढा
अफाट कर्तृत्वाने घाल दाही दिशांना वेढा
सौंदर्याला दे तुझ्या कर्तृत्वाची जोड
तुझ्या उंच भरारीला नसेल कशाचीच तोड
विज्ञान अन परंपरा यांची सांगड घाल मस्त
घडव तुझे आयुष्य बिनधास्त अन जबरदस्त
फुलराणी आहेस तू हे विसरू नकोस कधी
जग तुझे जीवन सुखाने छान स्वच्छंदी
अस्तित्वाच्या लढाईत बन अढळ, स्वाभिमानी
घडव तुझे प्रारब्ध अन हो खरी फुलराणी
