फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
408
फुलपाखरू मन माझे
इवल्या स्वप्नांचे पर
फुलांच्या गावी जाते
स्वार होऊन हवेवर!
सुगंध येता सकाराचा
भावनांच्या वनी विहरते
पराग कण सुविचारांचे
वेचण्यासाठी धावते!
नाजूक रंगीबेिरंगी फुले
आठवणींची उमलतात
तेव्हा जीवनाच्या बागेत
ही फुलपाखरे भिरभिरतात!
